sandeep Shirguppe
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतील वायू सेनेच्या दलाने पाकिस्तानमध्ये जात दहशतवादाला प्रत्त्यूत्तर दिले आहे.
भारतीय सशस्त्र दलांने पाकिस्तानमध्ये रात्री केलेल्या गोपनीय मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आलं.
भारतानं नऊ ठिकाणांना लक्ष्य केलंय. यातील ५ ठिकाणे पाकिस्तानमध्ये तर ४ ठिकाणे पाकिस्तान प्रांतातील काश्मीरमध्ये कारवाई केलीय.
बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाघ, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद या ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मद या मसूद अजहरच्या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय होते. मसूदने ही संस्था सुभान अल्लाह मशिदीमधून चालवली होती.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारत -पाक सीमेवर वारंवार गोळीबार केला जाते आहे. रात्री घडलेल्या घटनेनंतरही हल्ले करण्यात आले.
पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी "Act of War" अशी प्रतिक्रीया दिली. राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठकही बोलावली आहे.
पाकिस्तानने पूर्ण एअरस्पेस बंद केली आहे. म्हणजेच, सध्या पाकिस्तानच्या हद्दीतून कोणतीही विमानसेवा सुरु नाही.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, श्रीनगर विमानतळ बंद करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने अमेरिका, रशिया, ब्रिटन, युएई, सौदी अरेबिया यांसारख्या अनेक देशांना घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे.