Roshan Talape
कांद्यावरील काळे डाग Aspergillus Niger या बुरशीमुळे होतात.
घरातील चुकीची साठवणूक आणि आर्द्रता या बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरते.
काळ्या डागांमुळे कांद्याची पौष्टिकता कमी होते. त्यामुळे कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी कांदा ठेवल्यास काळे डाग टाळता येतात.
असे काळे डाग असलेला कांदा खाल्ल्यास अपचन, गॅस आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
या कांद्यातील बुरशीजन्य घटक (Mycotoxins) यकृत आणि मूत्रपिंडावर दुष्परिणाम करू शकतात.
तसेच अशा बुरशीजन्य कांद्याचे वारंवार सेवन केल्यास अॅलर्जी किंवा श्वासोच्छ्वासाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
काळे डाग असलेला कांदा खाल्ल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते.