Onion production : कांदा शेतकऱ्याला रडवतो, तरिही तो देशातील 'या' 5 राज्यांमध्ये कांदा सर्वाधिक पिकवला जातो

Aslam Abdul Shanedivan

कांद्याचे भाव

कांदा त्याच्या पडणाऱ्या भावामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नोव्हेंबरमध्ये 40 रुपये किलोने जाणारा कांदा आज 2 ते 5 रुपये किलोवर आला आहे. सरकारच्या फक्त एका धोरणामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Onion production | Agrowon

निर्यातीवर बंदी

कांद्याचे भावावर नियंत्रणासह महागाई कमी करण्याच्या उद्देशाने केंदेर सरकारने निर्यातीवर बंदी घातली. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी नाराज आहेत. असे असतानाही देशातील 'या' 5 राज्यांमध्ये कांदा सर्वाधिक पिकवला जातो.

Onion production | Agrowon

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कांद्याची स्थिती बिकट असतानाही भारतात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन हे येथेच होते. देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४२.७३ टक्के आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.

Onion production | Agrowon

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील शेतकरी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्याचा वाटा १५.२३ टक्के आहे.

Onion production | Agrowon

कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर

कांदा हा उन्हाळ्यात खाण्याचे अगणित फायदे आहेत. उत्पादनाच्या बाबतीत, भारतातील पहिल्या तीन राज्यांमध्ये कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ८.९३ टक्के उत्पादन होते.

Onion production | Agrowon

गुजरात चौथ्या क्रमांकावर

कांदा हा भाजीवर्गीय आहे असल्याने फक्त भारतातच नाही तर जगभर कांदा आवडीने खाल्ला जातो. बाजारपेठेतही कांद्याला मोठी मागणी आहे. कांदा उत्पादनात गुजरात चौथ्या क्रमांकावर असून येथे दरवर्षी ८.२१ टक्के उत्पादन होते.

Onion production | Agrowon

राजस्थान पाचव्या स्थानावर

कांदा उत्पादनात राजस्थान पाचव्या स्थानावर असल्याचे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार समोर येते. येथे ४.६५ टक्के कांद्याचे उत्पादन होते.

Onion production | Agrowon

Benefits of Saffron : औषधी गुण असणाऱ्या लाल सोन्याचे काही फायदे