Onion Seedling: खानदेशात कांदा लागवड घटणार?

Team Agrowon

खानदेशात धुळे जिल्हा कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. पण यंदा पाऊस कमी राहिल्याने धुळ्यासह जळगाव व नंदुरबारात कांदा लागवड कमी होईल.

Onion Export Ban | agrowon

सध्या कांदा रोपवाटिकांमध्ये रोपांची विक्री सुरू आहे. परंतु या विक्रीस शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळत आहे.

Rabi Onion Management | Agrowon

यंदा जुलै आणि ऑगस्टमध्येही कांदा लागवड कमी झाली होती. पावसाअभावी हजारांवर एकर शेतजमिनी कांदालागवडीअभावी पडून होत्या, आहेत.

Onion Crop

धुळे, नंदुरबार व जळगावात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. कमी पावसाचा परिणाम रब्बीतील कांदा लागवडीवर होताना दिसत आहे.

Onion Crop

धुळ्यात रब्बीतील कांद्याचे क्षेत्र ४० टक्क्यांनी घटले आहे. जळगाव जिल्ह्यातही कांदा लागवड कमी होत आहे. ज्यांनी कांद्याचे रोप वाढविले, ते रोप विक्रीसाठी तयार आहे.

Onion Rate | agrowon

परंतु अनेक जण लागवड कमी करीत असल्याने रोपे विक्रीस कमी प्रतिसाद आहे. धुळ्यात कांद्याचे धुळे आणि साक्री तालुक्यात, जळगावात यावल, चाळीसगाव, चोपडा भागात मोठे उत्पादन घेतले जाते.

Onion Export Ban | agrowon
क्लिक करा