sandeep Shirguppe
बडीशेपचे सेवन केल्याने केवळ वजन कमी होत नाही तर आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्या दूर होतात.
बडीशेपमध्ये आढळणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे हाडांची रचना आणि ताकद वाढवण्यास मदत करतात.
फॉस्फेट, कॅल्शियम, लोह, झिंक, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन 'के' हाडांच्या विकासासाठी मदत करतात.
बडीशेपमध्ये असलेले पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे घटक रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करू शकतात.
बडीशेपमध्ये नायट्रेट्स असतात जे वासोडिलेटरी आणि व्हॅसोप्रोटेक्टिव्ह गुणधर्मांनी समृद्ध असतात.
बडीशेपमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. हे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.
आरोग्यासाठी फायदेशिर असलेल्या बडीशेपचे, पाने आणि फुलं यांचाही बडीशेप चहा बनवता येतो.
आहारात बडीशेप समाविष्ट करण्यासाठी तुम्ही बडीशेपच्या पाण्याची मदत घेऊ शकता