Anuradha Vipat
जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा किंवा कपाटात पडून ठेवण्यापेक्षा त्यांना नवीन लूक देणे ही सध्याची फॅशन आहे.
तुमच्या आवडीच्या जुन्या साडीला मॉडर्न लूक देण्यासाठी खालील या काही भन्नाट आयडिया आणि टिप्स एकदा नक्की ट्राय करा.
साडीवर एखादा मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट लेदर बेल्ट किंवा एम्ब्रॉयडरी केलेला कमरपट्टा लावा.
जर तुम्हाला इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल, तर साडीसोबत पारंपारिक ब्लाउजऐवजी डेनिम जॅकेट किंवा पांढरा शर्ट घालून पहा
साडीच्या निऱ्या पायघोळ ऐवजी जीन्स किंवा लेगिंग्स मध्ये खोचून नवीन स्टाईल करा
जर साडी पूर्णपणे चांगली असेल पण नेसायला बोअर वाटत असेल, तर त्यापासून एक फ्लोई अनारकली ड्रेस किंवा पार्टी वेअर गाऊन शिवून घ्या.
जुन्या सुती किंवा सिल्क साड्यांचे रूपांतर सुंदर कुर्ता, स्कर्ट किंवा मॉडर्न पॅलाझो मध्ये करता येते.