Anuradha Vipat
तेलकट त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि चेहरा चमकदार ठेवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत.
तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती सर्वोत्तम मानली जाते. ही माती त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते
कोरफडीचा गर नैसर्गिकरित्या तेलकटपणा नियंत्रित करतो आणि मुरुमे येण्यापासून रोखतो.
लिंबातील 'सायट्रिक ॲसिड' तेल शोषण्यास मदत करते. मध हे नैसर्गिकरित्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते.
टोमॅटोमध्ये तेल शोषून घेण्याची क्षमता असते आणि ते त्वचेला थंडावा देतात .
पपईचा गर चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग कमी होते आणि अतिरिक्त सीबमवर नियंत्रण मिळते.
दिवसातून दोनदा 'सॅलिसिलिक ॲसिड' किंवा 'टी ट्री ऑइल'युक्त ऑइल-फ्री फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवावा .