Anuradha Vipat
केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा काही चुकीच्या सवयींमुळे केसांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
केस ओले असताना त्यांचे मूळ मऊ आणि नाजूक असते . अशा वेळी कंगवा फिरवल्याने केस जास्त तुटतात.
खूप गरम पाण्याने केस धुण्यामुळे डोक्यातील नैसर्गिक ओलावा आणि तेल निघून जाते.
रोज शॅम्पू केल्याने टाळूवरील नैसर्गिक संरक्षण कवच निघून जाते.
हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लिंग आयर्न यांसारख्या साधनांच्या उष्णतेमुळे केसांची मुळे कमकुवत होतात.
केस सतत खूप घट्ट बांधल्याने केसांवर ताण येतो आणि ते मुळापासून गळू लागतात
आहारात प्रोटीन, लोह आणि जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास केस पातळ आणि कमकुवत होतात.