October Heat Stress: ऑक्टोबर हीटमध्ये वासरांची काळजी कशी घ्याल? ८ महत्त्वाच्या टिप्स

Swarali Pawar

वासरांना उष्णतेचा ताण!

वाढत्या तापमानाचा लहान वासरांवर लवकर परिणाम होऊ शकतो. त्यांची भूक कमी होणे, वेगाने श्वास घेणे आणि सुस्तपणा ही उष्णतेच्या ताणाची लक्षणे आहेत.

Calf Care Tips | Agrowon

गोठा थंड ठेवा

गोठ्यात हवा खेळती राहील अशी व्यवस्था करा आणि गरजेनुसार पंखे लावा. वासरांना थेट उन्हात बांधू नका, तसेच छतावर गवत, गोणपाट किंवा शेडनेटचा वापर करा.

Calf Care Tips | Agrowon

स्वच्छ पाणी द्या

वासरांना दिवसभर स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध ठेवा. पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करा आणि पाणी पिण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा तरी संधी द्या.

Calf Care Tips | Agrowon

आहाराच्या वेळा बदला

कडक उन्हाच्या वेळी जड आहार देणे टाळा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी हिरवा आणि पचायला सोपा चारा द्या.

Calf Care Tips | Agrowon

काफ स्टार्टर द्या

वासरांच्या वाढीसाठी केवळ दूध पुरेसे नसते. वयानुसार प्रथिनेयुक्त आणि दर्जेदार काफ स्टार्टर द्या, जेणेकरून वाढीसाठी आवश्यक पोषण मिळेल.

Calf Care Tips | Agrowon

वयानुसार स्टार्टरचे प्रमाण

२ ते ३ आठवडे वयाच्या वासरांना ५० ते १०० ग्रॅम, १ ते २ महिन्यांच्या वासरांना १०० ते २५० ग्रॅम स्टार्टर देण्याची शिफारस आहे. २ ते ३ महिन्यांना ५०० ग्रॅम ते १ किलो, तर ३ ते ४ महिन्यांना १ ते १.५ किलो प्रमाणाचा विचार करा.

Calf Care Tips | Agrowon

हगवणीकडे दुर्लक्ष करू नका

लहान वासरांना पांढरी हगवण लागल्यास शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊ शकतात. वासरू सुस्त दिसल्यास किंवा हगवण सुरू झाल्यास तातडीने पशुवैद्यकांचा सल्ला घ्या.

Calf Care Tips | Agrowon

लसीकरण आणि स्वच्छता

गोठा स्वच्छ ठेवा आणि गोचीड, पिसवा व माशांचा प्रादुर्भाव नियंत्रित करा. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने वेळापत्रकानुसार लसीकरण आणि जंतनिर्मूलन करा.

Calf Care Tips | Agrowon

Farm Pond Evaporation: दुष्काळात शेततळ्यातील बाष्पीभवन कमी करण्याचे ७ उपाय

अधिक माहितीसाठी..