Obesity Rates : लठ्ठपणा वाढतोय का? २०२२ मध्ये लठ्ठपणाचे प्रमाण चौपट

sandeep Shirguppe

लठ्ठ व्यक्तींची संख्या

जगातील लठ्ठ व्यक्तींची एकूण संख्या एक अब्जांवर गेल्याचे 'लॅन्सेट' या नियतकालिकातील आकडेवारीवरून उघड झाले.

Obesity Rates | agrowon

सर्वच स्तरातील गट

मुलांसह, किशोरवयीन व प्रौढांचा समावेश आहे. जगभरात १९९०च्या तुलनेत २०२२ मध्ये लठ्ठपणाचे प्रमाण चौपट झाल्याची माहिती आहे.

Obesity Rates | agrowon

लठ्ठपणावर सर्वेक्षण

वैज्ञानिकांचे जागतिक नेटवर्क असलेल्या एनसीडी जोखमीचे घटक सहयोग व जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे लठ्ठपणावर सर्वेक्षण केले.

Obesity Rates | agrowon

१९९० पासून प्रमाण

जगात १९९० पासून कमी वजन असलेल्या लोकांचे प्रमाण घटत असून अनेक देशांत कुपोषणाचा सर्वाधिक सामान्य प्रकार म्हणून लठ्ठपणा वाढत आहे.

Obesity Rates | agrowon

कुपोषणाचाच प्रकार

लठ्ठपणा तसेच कमी वजन हे कुपोषणाचेच प्रकार असून ते लोकांच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक आहेत.

Obesity Rates | agrowon

लॅन्सेटचा अहवाल

लॅन्सेटच्या या ताज्या अहवालात कुपोषणाच्या या दोन्ही प्रकारांबद्दलचा ३३ वर्षांतील कल सविस्तर दिला आहे.

Obesity Rates | agrowon

मुलींचे वजन कमी

१९९० ते २०२२ दरम्यान जगातील मुले व किशोरवयीनांमधील कमी वजन असणाऱ्यांचे प्रमाण मुलींमध्ये एकपंचमांश तर मुलांमध्ये एक तृतीयांशने कमी झाले.

Obesity Rates | agrowon

मुलींमधील लठ्ठपणाचा दर

मुलींमधील लठ्ठपणाचा दर १९९० मधील ०.१ टक्क्यांवरून २०२२ मध्ये ३.१ टक्क्यांवर तर मुलांमध्ये ०.१ टक्क्यांवरून ३.९ टक्क्यांवर गेला आहे.

Obesity Rates | agrowon