Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी ओट्स उपमा हा एक उत्तम, पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्त्याचा पर्याय आहे.
ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन्स असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि अवेळी भूक लागत नाही.
रोल्ड ओट्स किंवा इन्स्टंट ओट्स,बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेला टोमॅटो,मिश्र भाज्या,हिरवी मिरची,आले,तेल किंवा गाईचे तूप,मोहरी आणि जिरे,कढीपत्ता आणि कोथिंबीर,हळद,लिंबाचा रस,मीठ, पाणी.
ओट्स तेल न टाकता ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर हलके भाजून घ्या. त्याच पॅनमध्ये १ छोटा चमचा तेल किंवा तूप गरम करा.
तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकून तडतडू द्या. त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची, किसलेले आले आणि कांदा घालून कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या.
आता यामध्ये टोमॅटो आणि तुमच्या आवडीच्या सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घाला. त्यात हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. भाज्या लवकर शिजण्यासाठी पॅनवर २ मिनिटे झाकण ठेवा.
भाज्या हलक्या शिजल्यावर त्यात दीड ते २ कप पाणी घाला आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. ओट्स सर्व पाणी शोषून घेतील. त्यानंतर पॅनवर झाकण ठेवून मंद आचेवर २ ते ३ मिनिटे उपम्याला छान वाफ काढून घ्या.