Jaggery Nutrisheel Brand : गुळाचा 'न्‍यूट्रिशील' ब्रॅण्ड, आता मिळतेय परदेशात मागणी

sandeep Shirguppe

गुळ उद्योग

लुप्त पावत चाललेल्या गूळ उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी कोल्हापूर येथील शील कोरगावकर यांनी नवा ब्रॅण्ड तयार केला आहे.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon

कोरगावकर कुटुंब

गूळ व धान्य व्यवसायाच्या निमित्ताने कोरगावकर कुटूंब कोल्हापूर येथे स्थायिक झाले. नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती शील कृषी पदवीधारक आहेत.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon

गूळ आधारित उत्पादन

विविध बाजारपेठांमधील गूळ आधारित उत्पादनांचा अभ्यास करत कोरगावकरांनी सन २०१८ च्या सुमारास स्वतः निर्मितीत उतरण्याचे ठरवले.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon

वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन

अनेक प्रयत्‍नांनंतर वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन तयार झाले व त्यानुसार पुढील तशी उत्पादने तयार करण्याची दिशा मिळाली.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon

क्यूब्ज

फळपल्पवर आधारित- पेरू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, आंबा या फळांचा पल्प आणि उसाचा रस यांच्या मिश्रणातून क्यूब्ज.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon

मसाले

मसाले आधारित- सुंठ, वेलची, दालचिनी आधारित क्यूब्ज नट्‍स आधारित- खोबरे, तीळ, शेंगदाणे, फुटाणे आधारित.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon

चॉकलेट

चॉकलेट्‍स- बटरस्कॉच, व्हाइट, कोको पावडर, खजूर आधारित ५, १५, ५०० ग्रॅम पॅकेटमध्ये विक्री होते. त्याची किंमत २०० रुपये प्रति किलो ठेवली आहे.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon

न्‍यूट्रिशील ब्रॅण्ड

न्‍यूट्रिशील असा ब्रॅण्ड तयार केला आहे. कोल्हापुरी जॅगरोलेट (गुळाचे चॉकलेट) असेही त्याला नाव दिले आहे.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon

आठ ग्रॅम वजनी मोदक

संक्रातीला लागणाऱ्या तिळाच्या मिश्रणाच्या गूळवड्या तयार केल्या गणेशोत्‍सवात गुळाचे मोदक सर्वत्र असतात.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon

...अशी मिळवली बाजारपेठ

शील यांनी न्यूट्रिशील नावने वेबसाइट तयार केली आहे. त्यात ‘सिनेमॅटिक’ पद्धतीचे व्हिडिओज तयार करून उत्पादनांची जाहिरात केली.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon

परदेशात मागणी

सध्या पंधरा टक्के गूळ ऑस्ट्रेलिया, दुबई येथे निर्यात केला जात आहे. रायपूर, छत्तीसगड, नागपूर, हुबळीसह मुंबईतूनही उत्पादनांना मागणी आहे.

Jaggery Nutrisheel Brand | agrowon