sandeep Shirguppe
उन्हाळा लागला की बाजारात पिकलेल्या आंब्यांनी बाजार अगदी फुललेली असते, हे फळ प्रत्येकाला आवडणारं आहे.
अनेकजण पिकलेले आंबे खाऊन त्यांची साल उपयोगाची नाही म्हणून फेकून देतात. पण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
आंब्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आंब्याची साल चेहऱ्याला लावल्याने त्वचा उजळ होते.
आंब्याची साल त्वचेला हायड्रेट करण्यात मदत करू शकते आणि त्वचेचा कोरडेपणा घालवण्यातही ती फायदेदायी ठरते.
आंब्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात.
कमी वयात चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या रिमूव्ह करतात आणि त्वचा तरुण आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
आंब्याच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते मुरुमांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरते.
आंब्याच्या सालीमध्ये असलेले एन्झाईम्स त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करण्यात, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यात मदत होते.
ही माहिती घरघुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारलेली आहे. उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला एकदा नक्की घ्या.