Goat Farming : शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पाला

Team Agrowon

शेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या पशुखाद्य व वैरणीच्या प्रकारावर अवलंबून असते. त्यामुळे चाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल, अशा शेवगा झाडांची लागवड नक्की करावी.

Goat Farming | Agrowon

पी.के. एम.१ मोरिंगा ही चाऱ्यासाठी उपयुक्त जात आहे. याच्या वर्षभर अनेक कापण्या मिळतात, त्यामुळे वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो.

Goat Farming | Agrowon

शेळ्या, दुधाळ जनावरे आणि मानवी आहारामध्येही शेवगा उपयुक्त आहे. जनावरांसाठी तर हे एक सकस वैरणीचे पीक आहे.

Goat Farming | Agrowon

शेवगा जलद वाढ व जमिनीत खोलवर मुळे जात असल्यामुळे हा कमी पाण्यात तग धरणारा वृक्ष आहे.

Goat Farming | Agrowon

अत्यंत पौष्टिक, तसेच पाने व खोड लुसलुशीत असल्याने जनावरे व शेळ्या त्याचा पाला आवडीने खातात.

Goat Farming | Agrowon

शेवग्यामध्ये कोणतेही विषारी घटक नसल्याने शेळ्यांना कोणताही अपाय होत नाही.

Goat Farming | Agrowon

इतर झाडपाल्यापेक्षा शेवगा शेळ्या आवडीने खातात.

Goat Farming | Agrowon