Anuradha Vipat
अळूच्या पानांप्रमाणेच तिचे कंद म्हणजेच अरवी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेल्या अरवीमुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
अरवीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास दूर होऊन पचनसंस्था निरोगी राहते.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर अरवी उत्तम पर्याय आहे.
अरवीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.
यात असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
अरवीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे दृष्टी सुधारण्यास आणि त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करते.