Mahesh Gaikwad
देशात अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अतिरिकत उत्पन्नाचा स्त्रोत आहे.
परंतु आता पशुपालनासाठी सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे. मध्य प्रदेश सरकारने गायी पालन करणाऱ्या पशुपालकांसाठी अनुदान योजनेची घोषणा केली आहे.
या योजनेंतर्गत गायी पालन करणाऱ्या पशुपालकांना अनुदान आणि दुधासाठी बोनससुध्दा देणार येणार आहे.
राज्यातील मोकाट, भाकड आणि बेवारस गायी पालनासाठी हे अनुदान राज्य सरकार देणार आहे.
या योजनेत जे शेतकरी १० पेक्षा अधिक गायींचे पालन करतील, अशा शेतकऱ्यांना सरकार अनुदान देणार आहे.
याशिवाय या पशुपालकांना गहू आणि भात खरेदीच्या धरतीवर बोनससुध्दा देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकार बेवारस आणि मोकाट गायींसाठी गोशाळाही उभारणार आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून मोकाट जनावरांच्या समस्येपासूनही सुटका होणार आहे.