Team Agrowon
शेतीला पूरक धंदा म्हणून अनेक शेतकरी शेळीपालन करतात. शेळीपालनातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळते.
शेळीपालन प्रामुख्याने दूध आणि मांसासाठी केले जाते. याशिवाय बोकडांच्या कातडीपासून चमड्याच्या वस्तू तयार होतात.
पण शेळीची अशी एक जात आहे, जीचा उपयोग दूध आणि मांसाशिवाय ओझं वाहण्यासाठी केला जातो.
ही शेळी विशेषत: डोंगराळ आणि थंड प्रदेशात पाळली जाते. या जातीच्या शेळीला गद्दी शेळी म्हणून ओळखले जाते.
ही शेळी एका वेतामध्ये जवळपास ५० लिटरपर्यंत दूध देते.
तसेच या जातीच्या शेळी आणि बोकडांमध्ये मांसाचे प्रमाणाही जास्त असते.
ही शेळी प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, चंबा, शिमला या सारख्या भागात पाहायला मिळते.