Methi Cultivation : कमी खर्चात, कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या मेथीची लागवड

Team Agrowon

मेथी ही भाजी अनेकांच्या आवडीची असते. त्यामुळे दैनंदिन आहारात मेथीचा वापर होतो. या कारणामुळे मेथीला वर्षभर चांगली मागणी असते.

Methi Cultiavtion | Agrowon

मेथी हे कमी कालावधीचे भाजीपाला पीक असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक आहे. भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी मेथीची टप्प्या-टप्याने लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते.

Methi Cultiavtion | Agrowon

मेथीची लागवड प्रामुख्याने जून आणि फेब्रुवारी महिन्यात केली जाते. मेथी ची दोन प्रकारे लागवड करता येते. मुख्य पीक म्हणून आणि आंतरपीक (Intercropping) म्हणून. मुख्य पीक म्हणून लागवड करायची असल्यास तीन मिटर बाय दोन मीटर च्या सपाट वाफ्यामध्ये लागवड करतात.

Methi Cultiavtion | Agrowon

दोन ओळींमध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतर ठेवून मेथीचे बी फेकून लागवड करतात. तसेच आंतरपीक म्हणून मेथी पिकाची लागवड करायची असल्यास मुख्य पिकातील मोकळ्या जागेत असणाऱ्या वीस ते तीन सेंटीमीटर जागेत लागवड करतात.

Methi Cultiavtion | Agrowon

मेथीचे मुख्य पीक म्हणून एक हेक्टर लागवडीसाठी पंचवीस ते तीस किलो बियाणे लागते. आंतरपीक घेताना आवश्यकतेनुसार बियाण्यांचे प्रमाण घ्यावे. बियाणे पेरताना एकसारखे आणि पातळ सोडावे. 

Methi Cultiavtion | Agrowon

फुले कस्तुरी हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केले आहे. हे वाण जास्त उत्पादनक्षम असून  जास्त फुटवे फुटतात. हे वाण मर आणि नागअळीला सहनशिल आहे. या मेथीची उगवण लागवड केल्यावर सात ते आठ दिवसात होते.

Methi Cultiavtion | Agrowon

कस्तुरी सिलेक्शन हे वाण भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे संशोधित करण्यात आले आहे. हे वाण खायला चविष्ट असते.

Methi Cultiavtion | Agrowon
आणखी पाहा...