Anuradha Vipat
पूर्वीच्या काळी स्त्रिया घरात आणि शेतात सतत शारीरिक काम करत असत.
गरोदरपणात सक्रिय राहिल्यानेओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढते.
संतुलित आहार घेतल्याने वजन नियंत्रणात राहते आणि प्रसूतीदरम्यानच्या गुंतागुंत कमी होतात.
गरोदरपणात तणाव कमी ठेवणे आणि सकारात्मक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पूर्वी प्रसूतीसाठी केवळ पाठीवर झोपण्याऐवजी बसणे, उकिडवे बसणे किंवा उभे राहणे या स्थितींचा वापर केला जात असे.
पुर्वी बहुतांश प्रसूती घरी होत असत ज्यात स्त्रियांच्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेवर विश्वास ठेवला जायचा.
वेदना कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय वापरले जात, जसे की गरम पाण्याचा शेक, चालणे, आणि मानसिक आधार.