Anuradha Vipat
नॉनस्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणे हे ठराविक मर्यादेपर्यंत सुरक्षित मानले जाते
नॉनस्टिक भांड्यांवर अन्नाला चिकटू न देणारा जो लेप असतो, तो 'PTFE' किंवा सामान्यतः 'टेफ्लॉन' म्हणून ओळखला जातो.
नॉनस्टिक भांडी खूप जास्त तापमानापर्यंत गरम केल्यास टेफ्लॉनचा लेप तुटायला सुरुवात होते. त्यातून विषारी वायू बाहेर पडतात.
विषारी वायू श्वासावाटे शरीरात गेल्यास 'पॉलिमर फ्युम फिव्हर' नावाचा फ्लू-सदृश आजार होऊ शकतो.
नॉनस्टिक भांडी कधीही रिकामी गॅसवर जास्त वेळ गरम करू नका.
नॉनस्टिक भांड्याला ओरखडे पडल्यास किंवा लेप खराब झाल्यास ते वापरणे ताबडतोब बंद करा.
जोपर्यंत तुम्ही नॉनस्टिक भांडी योग्य काळजी घेऊन आणि मध्यम आचेवर वापरत आहात तोपर्यंत ती सुरक्षित आहेत.