Non Sticky Bhindi Recipe : 'या' पद्धतीने करा भेंडीची भाजी होणार नाही चिकट

Anuradha Vipat

भेंडी धुणं

भेंडी धुवल्यानंतर ती कापण्यापूर्वी कापडाने पुसून पूर्ण कोरडी करा.

Non Sticky Bhindi Recipe | Agrowon

लिंबाचा रस किंवा आमसूल

भाजी शिजत असताना त्यात २ थेंब लिंबाचा रस, थोडे आमसूल किंवा चिंचेचा कोळ घाला.

Non Sticky Bhindi Recipe | agrowon

मीठ

भाजी पूर्ण शिजत आल्यावर सर्वात शेवटी मीठ घाला. सुरुवातीला मीठ घातल्यास भेंडीला पाणी सुटते आणि ती चिकट होते.

Non Sticky Bhindi Recipe | Agrowon

झाकण

भेंडी शिजवताना कढईवर कधीही झाकण ठेवू नका. वाफेमुळे पाणी सुटून भाजी बुळबुळीत होते.

Non Sticky Bhindi Recipe | Agrowon

फोडणी

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि भरपूर लसूण पाकळ्या ठेचून घाला.कापलेली भेंडी घालून मध्यम आचेवर ५-७ मिनिटे उघड्यावरच परता.

Non Sticky Bhindi Recipe | Agrowon

मसाले

भेंडीचा चिकटपणा कमी झाला की त्यात हळद, तिखट आणि गरम मसाला घाला. भाजी कुरकुरीत हवी असल्यास १ चमचा बेसन पीठ किंवा दाण्याचा कूट वरून पेरा.

Non Sticky Bhindi Recipe | Agrowon

शेवटचा हात

सर्वात शेवटी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

Non Sticky Bhindi Recipe | agrowon

Weight Loss Breakfast Ideas : रोज सकाळी करा नाश्ता ,वजन कमी होण्यास होईल मदत

Weight Loss Breakfast Ideas | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...