Mahesh Gaikwad
महिला आसो की पुरूष आजकाल सर्वांना उजळ, चमकदार आणि मुलायम त्वचा हवी आहे. यासाठी प्रत्येकजण आपापले स्किन केअर रूटीन फॉलो करतो.
दिवसभराचा थकवा, धूळ आणि प्रदूषण यामुळे त्वचा निस्तेज होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी स्किन रूटीन केअर आवश्यक आहे.
झोपण्यापूर्वी तुम्ही लावलेला मेकअप क्लिनसरच्या साहाय्याने क्लिन करा. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाहीत.
तुमच्या त्वचेनुसार चेहऱ्यासाठी फेसवॉशचा वाप करा. यामुळे दिवसभरातील चेहऱ्यावरची घाण साफ होते.
जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला नाईट क्रीम किंवा मॉइश्चुरायझर लावा.
रात्री झोपताना चेहऱ्याला व्हिटामिन-सी सिरम लावल्यास चेहरा उजळ आणि हायड्रेट होतो.
यानंतर चेहऱ्यावर टोनर लावा, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.