Aslam Abdul Shanedivan
वृत्तपत्र हे देश आणि जगभरातील बातम्या वाचण्यासाठी खरेदी केला जातो. पण दिवससंपताच त्याची गरज नाहीशी होते.
यानंतर लोक वृत्तपत्रास कचरा समजतात आणि फेकून देतात किंवा तो रद्दी म्हणून विकतात.
पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही तुमच्या घरातील बागकामातही या वर्तमानपत्राचा वापर करू शकता.
बागेतील मातीचे तापमान रोखण्यासाठी मल्चिंग म्हणून वर्तमानपत्राचा वापर करता येतो. यामुळे तुम्ही पैसे खर्च न करता मल्चिंग करू शकता.
कार्बन आणि नायट्रोजनचे स्त्रोत वर्तमानपत्रात आढळतात. ही दोन्ही पोषक तत्वे झाडांच्या वाढीस मदत करतात. यामुळे कंपोस्टची गुणवत्ता वाढविण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करू शकता
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात थंडी आणि दव पडते. अशावेळी वनस्पतीभोवती वर्तमानपत्र गुंडाळून थंडी आणि पडणाऱ्या दवापासून वनस्पती संरक्षण होऊ शकते
वृत्तपत्र बराच काळ ओलावा टिकवून ठेवतात. वर्तमानपत्राच्या मदतीने तुम्ही बागेत बियाणे उगवण करू शकता. तसेच पेरलेल्या बियांचे पक्षांपासून संरक्षण करते.