Ranikhet Disease: वाढत्या उष्णतेत कोंबड्यांना मानमोडी रोगापासून वाचवा! प्रतिबंधाचे ३ उपाय

Swarali Pawar

मानमोडी रोगाचा धोका वाढतोय!

ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेच्या काळात कोंबड्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मानमोडी म्हणजेच राणीखेत रोगामुळे कळपात मोठ्या प्रमाणात मरतुक होऊ शकते आणि अंडी उत्पादनावरही परिणाम होतो.

Ranikhet Disease | Agrowon

श्वासाचा त्रास, हिरवी हगवण

मानमोडी रोग झालेल्या कोंबड्यांना श्वास घेताना त्रास होतो, नाकातून पाणी येते आणि पातळ हिरवट किंवा पांढरी विष्ठा दिसू शकते. मान वाकडी होणे, पंख-पाय लुळे पडणे, थरथरणे आणि अंडी उत्पादन घटणे हीदेखील संभाव्य लक्षणे आहेत.

Ranikhet Disease | Agrowon

उपाय १, वेळेवर लसीकरण

मानमोडी रोगावर खात्रीशीर उपचार उपलब्ध नसल्याने लसीकरणाद्वारे प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. पिल्लांचे वय, कोंबड्यांचा प्रकार आणि स्थानिक रोगस्थितीनुसार पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरणाचे वेळापत्रक ठरवा.

Ranikhet Disease | Agrowon

उपाय २, शेडची स्वच्छता

कोंबड्यांची विष्ठा, दूषित खाद्य-पाण्याची भांडी आणि कपडे-बुटांमधून रोगाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे शेड नियमित स्वच्छ व निर्जंतुक करा, खाद्य-पाण्याची भांडी स्वच्छ ठेवा आणि बाहेरील व्यक्तींचा प्रवेश नियंत्रित करा.

Ranikhet Disease | Agrowon

उपाय ३, विलगीकरण

कळपातील कोंबड्यांना अचानक श्वासाचा त्रास, हिरवी हगवण किंवा मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे दिसल्यास तातडीने पशुवैद्यकांना संपर्क करा. आजारी कोंबड्या वेगळ्या ठेवा, त्यांची खाद्य-पाण्याची व्यवस्था स्वतंत्र करा आणि मृत पक्ष्यांची विल्हेवाट पशुवैद्यकीय मार्गदर्शनानुसार लावा.

Ranikhet Disease | Agrowon

औषधांचा वापर काळजीपूर्वक करा

मानमोडी हा विषाणूजन्य आजार असल्याने अँटिबायोटिक्स विषाणूवर थेट उपचार करत नाहीत. दुय्यम जिवाणू संसर्ग असल्यासच पशुवैद्यकांच्या सल्ल्याने त्यांचा वापर करा आणि स्वतःहून औषधे देणे टाळा.

Ranikhet Disease | Agrowon

अंडी उत्पादनातील बदलांकडे लक्ष

मोठ्या कोंबड्यांमध्ये अंडी देण्याचे प्रमाण अचानक कमी होणे, कवच मऊ होणे किंवा अंड्याचा आकार बदलणे अशी लक्षणे दिसू शकतात. कळपातील मरतुक आणि उत्पादनातील बदल नोंदवा व संशय आल्यास रोगाचे निदान करून घ्या.

Ranikhet Disease | Agrowon

जैवसुरक्षा पाळा, नुकसान टाळा

फार्ममध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचे बूट आणि कपडे स्वच्छ ठेवा तसेच कुत्रे-मांजरींसारख्या प्राण्यांचा शेडमधील वावर नियंत्रित करा. लसीकरण, स्वच्छता आणि आजारी पक्ष्यांचे त्वरित विलगीकरण या उपायांमुळे रोगाचा प्रसार कमी करण्यास मदत होते.

Ranikhet Disease | Agrowon

Garlic Cultivation: यंदा रब्बीत लसूण लावावा का? लागवडीपूर्वी ८ गोष्टी तपासा!

अधिक माहितीसाठी..