Winter Baby Care : हिवाळ्यात नवजात बाळाला उबदार आणि निरोगी ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय

Anuradha Vipat

प्रतिकारशक्ती

हिवाळ्यात वातावरणातील गारवा, कोरडी हवा आणि संसर्गाचा वाढलेला धोका यामुळे नवजात बाळांची प्रतिकारशक्ती कमी पडू शकते.

Winter Baby Care | Agrowon

उपयुक्त

नवीन मातांसाठी आपल्या चिमुरड्याला थंडीपासून सुरक्षित आणि उबदार ठेवण्यासाठी खालील ५ महत्त्वाच्या टिप्स अत्यंत उपयुक्त ठरतील.

Winter Baby Care | Agrowon

कपडे

बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी एकच मोठा जाड कपडा घालण्याऐवजी २ ते ३ मऊ सुती किंवा हलक्या लोकरीच्या कपड्यांचे थर घाला.

Winter Baby Care | Agrowon

अंघोळ

हिवाळ्यात बाळाला रोज अंघोळ घालण्याची गरज नसते, यामुळे त्वचा खूप कोरडी पडू शकते.

Winter Baby Care | agrowon

वेळ आणि पाणी

अंघोळ नेहमी दुपारी, जेव्हा थंडी कमी असते तेव्हा घाला आणि पाण्याचे तापमान जास्त गरम नसून कोमट असावे.

Winter Baby Care | agrowon

तेलाने मसाज

अंघोळीपूर्वी दिवसातून १ ते २ वेळा बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने बाळाच्या शरीराला हलक्या हाताने मसाज करा.

Winter Baby Care | Agrowon

बेबी लोशन

अंघोळीनंतर लगेच बाळाच्या नाजूक त्वचेचा कोरडेपणा रोखण्यासाठी सुगंध नसलेले बेबी लोशन किंवा क्रीम आवर्जून लावा.

Winter Baby Care | Agrowon

Foods That Damage Liver : 'या' पदार्थांमुळे होते लिव्हरचे मोठे नुकसान

Foods That Damage Liver | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...