Anuradha Vipat
नवीन वर्षात नशीब उजळण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार खालील प्रभावी घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत.
नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी मिठाच्या पाण्याने घराची फरशी पुसा.
पैसे कपाटाच्या मधल्या किंवा वरच्या कप्प्यात ठेवा आणि त्यात महालक्ष्मी यंत्र किंवा दक्षिणावर्ती शंख ठेवा.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून मंगल स्नान करा आणि कुलदैवतेची पूजा करा.
दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करणे किंवा मारुतीचे दर्शन घेणे अत्यंत फलदायी ठरू शकते.
नवीन वर्षात घरात तुळस, शमी किंवा मनी प्लांट लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावा, ज्यामुळे लक्ष्मीचे घरात आगमन होते.