Roshan Talape
देशात युपीआय वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी युपीआय प्रणाली चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने महत्त्वाचे बदल केले आहे. काय आहेत हे बदल पाहूयात.
या आधी यूपीआयची ट्रान्झॅक्शन मर्यादा एक दिवसासाठी १ लाख रुपये होती. मात्र, नवीन नियमानुसार ही मर्यादा आता ५ लाख रुपये करण्यात आली आहे.
या नवीन बदलामुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार म्हणजेच कर भरणे, रुग्णालयातील बिले, शैक्षणिक शुल्क, आयपीओमध्ये गुंतवणूक आणि आरबीआयच्या विविध योजनांमध्ये मोठे व्यवहार करता येणार आहे.
यूपीआय सर्कल या नवीन फीचरमध्ये युपीआयच्या प्राथमिक वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यातून इतर विश्वासार्ह व्यक्तींना, जसे की कुटुंबातील सदस्य किंवा मित्र, व्यवहार करण्याची अनुमती देण्याची सुविधा मिळते.
या बदलामुळे डिजिटल पेमेंट्स अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहे. तसेच आता मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज लागणार नाही.
यूपीआयचा वापर करताना तुमचे पिन आणि ओटीपी सुरक्षित ठेवावा. यामुळे तुमचे यूपीआय व्यवहार सुरक्षित राहतील.
फक्त अधिकृत यूपीआय अॅप्सचाच वापर करावा. यामुळे फिशिंग, डेटा चोरी यासारख्या धोक्यांपासून संरक्षण मिळते.
वेगवेगळ्या बॅंका यूपीआय ट्रान्झॅक्शनची मर्यादा बदलू शकतात. त्यामुळे यूपीआयमध्ये झालेले हे बदल डिजिटल इंडियाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.