Swarali Pawar
खोल नांगरट, सबसॉयलरचा वापर आणि सेंद्रिय खत दिल्यास जमिन भुसभुशीत होते. यामुळे मुळे खोलवर जातात, पाणी निचरा चांगला होतो आणि ऊस जोमाने वाढतो.
सऱ्या २०–२५ सेमी खोलीच्या आणि दिशेला दक्षिणोत्तर कराव्यात. हलक्या जमिनीत ४.५ फूट आणि भारी जमिनीत ५ फूट अंतर ठेवावे.
बाविस्टीन + इमिडाक्लोप्रिड द्रावणात १०–१५ मिनिटे बुडवावे. नंतर जैविक द्रावणात ३० मिनिटे ठेवल्यास उगवण सुधारते.
जड/क्षारपड जमिनीत कोरडी लागवड, हलक्या जमिनीत ओली लागवड करावी. जमिनीनुसार पद्धत बदलल्यास ऊसावर ताण कमी येतो
पहिल्या सहा महिन्यांत तण नियंत्रित करावे आणि नांग्या-बाळभरणी करावी. यामुळे फुटवे वाढतात आणि उसाची वाढ जोमदार होते.
खते देण्याचे तीन पर्याय आहेत यामध्ये सरळ खते, मिश्र खते आणि मिश्र/संयुक्त खते दिली जातात. सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि गंधक-सिलिकॉन द्यावेत. यामुळे ऊस जाड, मजबूत आणि साखर उतारा जास्त मिळतो.
शास्त्रशुद्ध बेणे, योग्य सऱ्या, सेंद्रिय खत, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि आंतरमशागत हे सर्व एकत्र वापरणेच आधुनिक ऊस लागवड आहे. यामुळे एकरी उसांची संख्या, जाडी, साखर उतारा आणि एकूण नफा लक्षणीय वाढतो.