Stubble Management: कापूस पऱ्हाटी जाळू नका; खतनिर्मिती करून दुप्पट फायदा मिळवा!

Swarali Pawar

पऱ्हाटी जाळल्याने होणारे नुकसान

पऱ्हाटी जाळल्याने जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि सेंद्रिय कर्ब कमी होतो.
यामुळे उत्पादनात घट होते आणि रासायनिक खतांवर अवलंबित्व वाढते.

Effect of Burning | Agrowon

पऱ्हाटी म्हणजे मोफत खत

कापूस पऱ्हाटीत नत्र, स्फुरद, पालाश भरपूर असते. ती जाळणे म्हणजे महागड्या खताऐवजी मोफत उपलब्ध खत नष्ट करणे.

Beneficial Residue | Agrowon

गोवर खत / कंपोस्ट

पऱ्हाटी गोवरखतासोबत मिसळली तर उच्च दर्जाचे सेंद्रिय खत तयार होते. यामुळे जमीन सुपीक राहते आणि पुढील पीक जोमदार उगवते.

Farm Yard Manure | Agrowon

गांडूळ खत

गांडूळखताने पऱ्हाटी काही दिवसांत कंपोस्ट होते. हे खत बाजारात जास्त भावाने विकता येते म्हणजे घरबसल्या नवीन उत्पन्नाचा मार्ग तयार होतो.

Vermicompost | Agrowon

बायोगॅस आणि जैविक खत

पऱ्हाटी बायोगॅस युनिटमध्ये वापरली तर स्वयंपाकासाठी गॅस मिळतो आणि स्लरी जैवखत बनते.
ऊर्जेचा खर्चही वाचतो आणि खतही मोफत मिळते.

Biogas | Agrowon

कॉटन श्रेडर

कॉटन श्रेडरने पऱ्हाटी भुगा करून शेतात मिसळल्यास ती ४५–६० दिवसांत खतात बदलते.
रब्बी पिकांची पेरणी वेळेवर करता येते आणि उत्पादन वाढते.

Cotton shredder | Agrowon

बोंड अळी नियंत्रण

पऱ्हाटी जाळण्याऐवजी श्रेडर वापरल्यास ७६% अळी नियंत्रण मिळते.
पुढील हंगामात किडीचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

Cotton boll Worm | Agrowon

शाश्वत शेतीचा संदेश

पऱ्हाटी कचरा नाही, ती सोन्यासारखी खताची खाण आहे! ती जाळू नका… खतनिर्मिती व मूल्यवर्धन करून उत्पादन व नफा दोन्ही वाढवा.

Sustainable farming | Agrowon

Stubble Management: उसाचे पाचट का जाळू नये?

अधिक माहितीसाठी...