Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत राहू हा एक छाया ग्रह मानला जातो.
जर पत्रिकेतील राहूची स्थिती अशुभ किंवा 'खराब' असेल, तर व्यक्तीच्या आयुष्यात अनपेक्षित समस्या निर्माण होतात.
व्यक्तीला निर्णय घेणे कठीण जाते. मनात सतत भीती, संशय आणि नकारात्मक विचार घर करतात.
व्यवसायात किंवा गुंतवणुकीत अचानक मोठे आर्थिक नुकसान होणे हे खराब राहूचे लक्षण आहे.
घरात विनाकारण वाद होणे, विशेषतः सासरच्या मंडळींशी किंवा वडिलांशी संबंध बिघडणे.
चुकीच्या संगतीमुळे दारू, जुगार किंवा इतर अमली पदार्थांच्या आहारी जाण्याची शक्यता वाढते.
रात्री झोपेत दचकून जागे होणे किंवा साप, सरपटणारे प्राणी स्वप्नात वारंवार दिसणे.