Anuradha Vipat
नवरात्रीच्या नऊ रात्री म्हणजे गरबा, दांडिया आणि फॅशनचा धमाका!
गरबा नाईटला सर्वात वेगळं आणि पारंपारिक दिसण्यासाठी चनिया चोली, इंडो-वेस्टर्न फ्युजन आणि बांधणी लहंगे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
गरब्याच्या तालावर थिरकताना तुमचा लूक एकदम परफेक्ट असावा, यासाठी काही भन्नाट आउटफिट आयडियाज खालीलप्रमाणे आहेत.
गरबा नाईटसाठी हा सर्वात सदाबहार लूक आहे. भरपूर घेर असलेला चनिया, त्यावर मिरर वर्क , कौडी आणि हेवी एम्ब्रॉयडरी असलेली चोली तुम्हाला अस्सल गुजराती लूक देईल.
जर तुम्हाला जड लेहेंगा सांभाळणे कठीण जात असेल, तर धोती पँट्स किंवा एथनिक स्कर्टवर क्रॉप टॉप आणि सोबत एम्ब्रॉयडरी जॅकेट ट्राय करा.
शुद्ध सिल्क किंवा कॉटनचा पटोला आणि बांधणी प्रिंट असलेला लेहेंगा कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही. लाल, पिवळा, हिरवा आणि राणी गुलाबी यांसारखे व्हायब्रंट रंग गरब्याच्या दिव्यांच्या प्रकाशात खूप उठून दिसतात.
जर तुम्हाला जास्त लाऊड फॅशन आवडत नसेल, तर फ्लोअर-लेंथ अनारकली कुर्ता आणि प्लाझो एक उत्तम पर्याय आहे.