Anuradha Vipat
नवरात्रीच्या नऊ रात्रींमध्ये गरबा आणि दांडिया खेळताना पुरुषांसाठी पारंपरिक लूक आणि कम्फर्ट दोन्ही महत्त्वाचे असते.
यंदाच्या नवरात्रीत पुरुषांसाठी खालील कुर्ता आणि केडियू स्टाईल्स प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत.
गळा, छाती किंवा हाताच्या बाहींवर जड मिरर वर्क आणि पारंपरिक कच्छी भरतकाम केलेले कुर्तवे गरब्याच्या रात्री खूप चमकतात.
जर तुम्हाला मॉडर्न ट्विस्ट हवा असेल, तर एका बाजूला कट असलेला किंवा खालील घेर असमान असलेला कुर्ता ट्राय करा.
साध्या पांढऱ्या किंवा सॉलिड रंगाच्या कुर्ता-पायजाम्यावर रंगीबेरंगी एम्ब्रॉयडरी केलेले शॉर्ट जॅकेट किंवा कोटी घालण्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे.
गरब्याचा अस्सल फील घेण्यासाठी घेरदार केडियू सर्वोत्तम पर्याय आहे. यात रंगीबेरंगी कॉटन फॅब्रिकवर जड गामठी वर्क, आरशांचे काम आणि टॅसेल्स लावलेले असतात.
पारंपारिक गुजराती केडियू जुन्या पद्धतीच्या धोतीऐवजी आजकाल रेडी धोती पॅंट्स किंवा ट्युलिप पॅंट्ससोबत मॅच केले जातात.
Singhara Atta : शिंगाड्याचे पीठ का मानले जाते सुपरफूड? थायरॉईडपासून रक्तदाबापर्यंत मिळतात 'हे' फायदे