Anuradha Vipat
नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. काही जण तर निर्जला उपवास करतात.
नवरात्रीत ज्या लोकांनी उपवास केला आहे त्यांना नेहमी प्रश्न पडतो की उपवासाला काय खायचे?
चला तर मग आज आपण या लेखात चविला स्वादिष्ट , पौष्टीक पण उपवासाला चालणारा पराठा कसा बनवायचा ते पाहूयात.
आज आपण उपवासाला चालणारा राजगिरा पराठा रेसिपी पाहणार आहोत. राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेला राजगिरा पराठा उपवासाच्या वेळी खाल्ला जातो.
राजगिरा पीठ, उकडलेला बटाटा, जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, दही, मीठ तेल/तूप .
राजगिरा पीठ घ्या. त्यामध्ये बटाटा, जिरे, कोथिंबीर, मिरची आणि मीठ घाला. हे मिश्रण मळून घ्या. त्याचे गोल पराठे लाटा.
पराठा दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम राजगिरा पराठा दही किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सर्व्ह करा