Anuradha Vipat
नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी योग्य आहाराची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
भगरीचे पीठ, साबुदाणा, फळे आणि शिंगाडा हे उपवासाचे मुख्य अन्न मानले जाते, तर गहू, तांदूळ आणि नेहमीचे मीठ पूर्णपणे टाळले जाते.
उपवासाला नेहमीच्या धान्यांऐवजी भगर, साबुदाणा, शिंगाड्याचे पीठ, आणि राजगिरा यांचा आहारात समावेश करा. यापासून तुम्ही थालीपीठ, खिचडी किंवा पुरी बनवू शकता.
सफरचंद, केळी, पपई, डाळिंब यांसारखी ताजी फळे भरपूर खा. शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी बदाम, काजू, अक्रोड आणि खजूर खाणे खूप फायदेशीर ठरते.
दूध, ताक, दही आणि पनीर यामुळे शरीराला भरपूर प्रोटीन मिळते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
गहू, तांदूळ, मैदा, सुजी आणि कोणत्याही प्रकारच्या डाळी किंवा कडधान्ये उपवासाला पूर्णपणे वर्ज्य असतात.
नेहमीचे पांढरे मीठ खाणे टाळा. तसेच हळद, मोहरी, हिंग, गरम मसाला आणि धणे पूड उपवासाच्या अन्नात वापरू नका.