Anuradha Vipat
नवरात्रीच्या गरबा नाईटला किंवा कोणत्याही सणासुदीला तुमचा पारंपारिक आउटफिट कितीही सुंदर असला, तरी तोपर्यंत अपूर्ण वाटतो जोपर्यंत त्यावर योग्य दागिन्यांची जोड दिली जात नाही.
यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुमचा पारंपरिक लूक अगदी परफेक्ट आणि आकर्षक बनवण्यासाठी खालील ट्रेंडी ज्वेलरी डिझाइन्स सर्वोत्तम पर्याय ठरतील.
गळ्याला घट्ट बसणारा सिल्व्हर किंवा ब्लॅक पॉलिश चोकर आणि सोबतीला मोठे झुमके तुमचा लूक एका झटक्यात स्टायलिश बनवतात.
सध्या बोहो लूक खूप ट्रेंडमध्ये आहे. ज्या दागिन्यांमध्ये कौड्या, रंगीत मणी आणि नाजूक घुंगरू असतात, ते गरबा खेळताना अतिशय सुंदर दिसतात .
जर तुम्हाला मेटलचे दागिने घालायचे नसतील, तर रंगीबेरंगी धाग्यांमध्ये गुंफलेले आरसे आणि नक्षीकाम केलेले धाग्यांचे हार उत्तम दिसतात.
लेहेंगा किंवा साडीच्या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी कंबरपट्टा नक्की परिधान करा. ऑक्सिडाइज्ड किंवा मोत्यांचा कंबरपट्टा तुमच्या कंबरेला सुरेख लुक देतो.
जर तुम्हाला गळ्यात काही घालायचे नसेल, तर फक्त मोठे आणि हेवी चांदबाली किंवा मल्टिलेअर झुमके कानात घाला. केवळ मोठ्या कानातल्यांमुळेही चेहऱ्याला एक भारी लुक येतो.