Anuradha Vipat
शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गेचे सहावे रूप असलेल्या माता कात्यायनीची पूजा केली जाते.
माता कात्यायनी ही शक्ती, शौर्य आणि विवाहातील अडथळे दूर करणारी देवी मानली जाते.
माता कात्यायनीला मधाचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ आणि प्रिय मानले जाते.
आजच्या दिवशी देवीला शुद्ध मध किंवा मधापासून तयार केलेले गोड पदार्थ अर्पण करावेत.
असे मानले जाते की, आज देवीला मधाचा नैवेद्य दाखवल्याने साधकाचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते आणि घरात गोडवा टिकून राहतो.
देवीला चांदीच्या किंवा तांब्याच्या पात्रात स्वच्छ मध अर्पण करावा.
शेवटी देवीची मनोभावे आरती करावी आणि पूजेत काही चूक झाली असल्यास क्षमा मागावी.