Navratri Day 5 : आजची देवी स्कंदमाता: पाचव्या माळेला अशी करा पूजा

Anuradha Vipat

आजची माळ

शारदीय नवरात्रीचा आज पाचवा दिवस असून आजची माळ ही माता स्कंदमातेची पूजा करण्यासाठी समर्पित आहे.

Navratri Day 5 | agrowon

'स्कंदमाता'

भगवान कार्तिकेय यांच्या माता असल्याने देवीला 'स्कंदमाता' असे म्हटले जाते. ही देवी वात्सल्य, मातृत्व आणि अथांग शक्तीचे प्रतीक मानली जाते.

Navratri Day 5 | agrowon

देवीचे स्वरूप

स्कंदमाता सिंहारूढ असून तिला चार भुजा आहेत. देवीने आपल्या दोन हातांत कमळाचे फूल धारण केले आहे, एका हाताने भक्तगणांना आशीर्वाद दिला आहे आणि एका हाताने बाल कार्तिकेयाला मांडीवर घेतले आहे.

Navratri Day 5 | agrowon

धार्मिक श्रद्धा

या रूपाची पूजा केल्याने बुद्धी आणि संकटांशी लढण्याची ताकद मिळते, तसेच कुंडलीतील बुध ग्रहाचे दोष दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Navratri Day 5 | agrowon

आजचा शुभ रंग

नवरात्रीच्या पाचव्या माळेचा अधिकृत रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा आनंद, उत्साह, ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.

Navratri Day 5 | agrowon

आजचा नैवेद्य

माता स्कंदमातेला केळी किंवा केळीपासून बनवलेले पदार्थ अत्यंत प्रिय आहेत.

Navratri Day 5 | agrowon

मंत्राचा जप

देवीला केळीचा नैवेद्य दाखवून खालील मंत्राचा १०८ वेळा जप करावा:

"ॐ देवी स्कन्दमातायै नमः॥"

Navratri Day 5 | agrowon

Horoscope 15 October 2026 : आजचा दिवस व्यापार वृद्धी आणि आर्थिक लाभ देणारा असेल

Horoscope 15 October 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...