Anuradha Vipat
पावसाळ्यात निसर्गातील बदल आणि दूषित वातावरणामुळे आपली पचनशक्ती मंदावते आणि संसर्गाचा धोका वाढतो .
पावसाळ्यात नेहमी पाणी उकळून कोमट करून प्या. त्यासोबतच दिवसातून एकदा पाण्यात तुळशीची पाने, सुंठ किंवा धने टाकून उकळलेले पाणी प्या.
निसर्गात मिळणारी तुळस, कोरफड, कडुनिंब, आणि गवती चहा यांचा आहारात वापर करा. आले, मिरी आणि दालचिनीचा हलका काढा दिवसातून एकदा घ्या .
निसर्गोपचारानुसार पावसाळ्यात आठवड्यातून एकदा किंवा १५ दिवसांतून एकदा हलका उपवास करावा. उपवासाच्या दिवशी फक्त कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा फळांचा रस घ्यावा.
पावसाळ्यातील थंड हवेमुळे सांधेदुखी आणि पाठीचे दुखणे वाढते . अशा वेळी दुखणाऱ्या भागावर कोमट तेलाचा मसाज करून कोरडा गरम शेक घ्या.
पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो. जेव्हा कधी ऊन पडेल, तेव्हा सकाळी १५-२० मिनिटे कोवळ्या उन्हात बसा.
दीर्घ श्वसनामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि दमट हवेमुळे होणारा दम्याचा त्रास कमी होतो.