Mahesh Gaikwad
निसर्गामध्ये लाखो प्रजातींच्या विविध वनस्पती आढळतात. यातील काही प्रजाती या त्यांच्या विशिष्ठ आकार, उंची आणि गुणधर्मांमुळे वैशिष्ट्यपूर्ण असतात.
निसर्गात असेच एक दुर्मिळे प्रजातीची वनस्पती आहे, जीला १०० वर्षातून एकदाच बहर येतो.
दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या जगातील या सर्वात उंच फुलझाडाला 'क्वीन ऑफ द अँडस' असे म्हटले जाते.
पुया रायमोंडी असे या झाडाचे नाव असून हे झाड ३० फूटांपर्यंत ऊंच वाढते. याचा फुलोरा दूरून एखाद्या मनोऱ्यासारखा दिसतो.
पुया रायमोंडी हे झाड ८० ते १०० वर्षांतून एकदाच फुलते आणि नंतर मरते. याला मोनोकार्पिक वनस्पती म्हणतात, जे एकदाच फुलते आणि मरते.
हे झाडाला एकाचवेळी तीन हजारांहून अधिक फुले फुलतात. याचा फुलोरा पाहणे म्हणजे निसर्गाचा अद्भूत चमत्कारच असतो.
थंड आणि कोरड्या हवामानात पुया रायमोंडीचे झाड जगते. याची पाने काटेरी असल्यामुळे जंगली प्राणीही सहजासहजी याच्या जवळ जात नाहीत.
ग्लोबल वॉर्मिंग आणि मानवी अतिक्रमणामुळे हे दुर्मिळ झाड लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.