Anuradha Vipat
आयुर्वेदापासून ते आधुनिक स्किन केअरपर्यंत कोरफडीला त्वचेसाठी एक वरदान मानले गेले आहे.
यामध्ये असलेल्या अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट्स आणि हायड्रेटिंग गुणांमुळे हे जेल त्वचेला खोलवर पोषण देऊन पिंपल्स, काळे डाग आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते.
कोरफडीमध्ये 'अँटी-बॅक्टेरियल आणि 'अँटी-इन्फ्लेमेटरी' गुण असतात. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.
कोरफडीचे जेल हे उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. हे तेलकट त्वचा चिकट न करता आणि कोरड्या त्वचेचा कोरडेपणा दूर करून त्वचेला मऊ आणि मुलायम बनवते.
ऊन्हामुळे त्वचा काळी पडली असल्यास किंवा जळजळ होत असल्यास कोरफड जेल लावल्याने त्वचेला लगेच थंडावा मिळतो.
कोरफडीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेमधील 'कोलाजेन' वाढवण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा तरुण दिसते.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज कमी करण्यासाठी रोज रात्री झोपताना डोळ्यांभोवती कोरफड जेलने हलका मसाज करावा.