Facial At Home : पार्लरचा खर्च वाचवा! घरच्या घरी फेशिअल करण्याची सोप्या स्टेप्सची पद्धत

Anuradha Vipat

नैसर्गिक चमक

घरच्या घरी फेशिअल केल्याने चेहऱ्यावरील धूळ, मृत त्वचा आणि अतिरिक्त तेल निघून जाते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.

Facial At Home | agrowon

पद्धत

पार्लरमध्ये न जाता घरच्या स्वयंपाकघरातील नैसर्गिक वस्तूंचा वापर करून ५ सोप्या स्टेप्समध्ये फेशिअल करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

Facial At Home | agrowon

क्लिंझिंग

२ चमचे कच्चे दूध घ्या. त्यात कापसाचा गोळा बुडवून संपूर्ण चेहरा आणि मान स्वच्छ पुसून घ्या. २ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

Facial At Home | Agrowon

स्क्रबिंग

१ चमचा तांदळाचे पीठ किंवा कॉफी पावडर घेऊन त्यात १ चमचा मध मिसळा. या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे वर्तुळाकार मसाज करा

Facial At Home | agrowon

स्टीमिंग

एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा. डोक्यावरून टॉवेल ओढून चेहऱ्याला ३ ते ५ मिनिटे वाफ घ्या.

Facial At Home | Agrowon

मसाज

१ चमचा अलोवेरा जेलमध्ये अर्धा चचा खोबरेल तेल किंवा बदाम तेल मिक्स करा. या क्रिमने चेहऱ्यावर खालून वरच्या दिशेने ५ ते ७ मिनिटे हलका मसाज करा.

Facial At Home | agrowon

फेस पॅक

१ चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि २ चमचे दही किंवा गुलाब पाणी एकत्र करून पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे ठेवा. पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

Facial At Home | agrowon

Homemade Hair Oil : केसांच्या सर्व समस्यांवर एकच तोडगा; जास्वंद आणि कढीपत्त्याचे घरगुती तेल बनवण्याची सोपी पद्धत

Homemade Hair Oil | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...