Mahesh Gaikwad
पेरू खायला तर सगळ्यांनाच आवडते, पण पेरू खाण्याचे जसे फायदे आहेत. तसेच पेरूची पाने खाणेही आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पेरूच्या पानांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरूची पाने चघळणे गुणकारी आहे.
पेरूच्या पानांधमध्ये असणाऱ्या घटकांमुळे मेटाबॉलिझम वाढते. पेरूच्या पानांचे नियमित सेवन केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी वितळते परिणामी वाढलेले वजनही कमी होते.
पेरूच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसचे पोटदुखी आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.
पेरूची पाने चावून-चावून खाल्ल्यास तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात. परिणामी तोंडाची दुर्गंधी कमी होते. याशिवाय दातदुखी आणि हिरड्याच्या दुखण्यांपासून आराम मिळतो.
पेरूची पाने केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याच्या पानांची पेस्ट किंवा रस केसांच्या मुळाशी लावल्या केसगळती थांबते.
पेरूच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवरील पुरळ, फोड, मुरमाचे डाग कमी होण्यास मदत होते.
पेरूच्या पानांमध्ये व्हिटामिन-सी, अँटी-बॅक्टेरियल घटत असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.