Mahesh Gaikwad
होळीच्या सणाला रंगांची मुक्त उधळण केली जाते. पण होळीच्या रंगातील केमिकल्समुळे केसांना नुकसान पोहचू शकते.
रंगातील हानिकारक केमिकल्सपासून केस सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायला हवे, याची माहिती पाहुयात.
होळीच्या रंगांमुळे केस कोरडे, रखरखीत आणि निर्जीव होतात. होळीला रंग खेळण्याअगोदर केसांना तेल लावल्यास केस सुरक्षित राहतात.
केवळ केसच नाही, तर रंगांमुळे केसांची मुळे आणि डोक्याच्या त्वचेलाही हानी होवू शकते. तेलामुळे डोक्याच्या त्वचेचे रंगापासून संरक्षण होते.
तेल केसांना एक सुरक्षात्मक कवच प्रदान करते. तसेच केसांचा ओलावा टिकून ठेवते.
केसांसाठी नारळाचे किंवा बदामाचे नैसर्गिक तेल उपयुक्त आहे. नैसर्गिक तेल केसांसाठी चांगले असते.
केसांमधील होळीचा रंग धुवून काढण्यासाठी सौम्य शॅम्पू लावावा आणि हळूवार मालिश करून रंग साफ करावा.
केसांतील रंग काढण्यासाठी गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरावे. गरम पाण्यामुळे केस अजूनच कोरडे आणि रखरखीत होतात. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.