Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.
जिरे: १ चमचा, दालचिनी: छोटा तुकडा, आलं: अर्धा इंच तुकडा, लिंबू: अर्ध्या लिंबाचा रस, पाणी: २ ग्लास
एका भांड्यात पाणी घ्या. त्यात जिरे, दालचिनी आणि आलं टाका. हे पाणी चांगले उकळून घ्या.
गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. कोमट झाल्यावर त्यात लिंबाचा रस मिसळा.
हे पेय तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसातून कोणत्याही वेळी घेऊ शकता.
तुमच्या आहारात विविध प्रकारची फळे आणि भाज्या यांचा भरपूर समावेश करा.
दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी आणि वजन व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे आहे