Anuradha Vipat
चटपटीत ब्रेड उपमा हा नाश्ता झटपट तयार होतो आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.
ब्रेड स्लाईस, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट,कढीपत्ता, शेंगदाणे, मोहरी , हळद , लाल तिखट , गरम मसाला, तेल ,मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि बारीक शेव.
ब्रेडच्या कडा कापून घ्या आणि ब्रेडचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. हे तुकडे तव्यावर टोस्ट करून घ्या.
कढईत मोहरी टाका. शेंगदाणे टाकून ते लालसर तळून घ्या. त्यात कढीपत्ता, हिरवी मिरची आणि चिरलेला कांदा टाका मऊ होईपर्यंत परता. आलं-लसूण पेस्ट घालून परता.
त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ टाका. टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवा. हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करा
आता तयार मसाल्यात ब्रेडचे तुकडे टाका २ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून वाफ काढा.
शेवटी वरून लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. गरमागरम ब्रेड उपमा प्लेटमध्ये काढून त्यावर थोडी बारीक शेव पेरा आणि आनंद घ्या!