Anuradha Vipat
हाडे कमकुवत असणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे.
हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शिअम सर्वात महत्त्वाचे आहे. दूध, दही, ताक आणि पनीरचा आहारात समावेश करा.
कॅल्शिअम शरीरात शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन-डी ची गरज असते. सकाळी कोवळ्या उन्हात १० ते १५ मिनिटे बसा. हा व्हिटॅमिन-डी चा नैसर्गिक स्रोत आहे.
हाडांच्या संरचनेसाठी प्रथिने महत्त्वाची असतात. यासाठी कडधान्ये , डाळी आणि सोयाबीनचे सेवन करा.
चालणे, जॉगिंग करणे किंवा पायऱ्या चढणे यामुळे हाडांची घनता वाढते.
ताडासन, वृक्षासन आणि त्रिकोणासन हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.
जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने 'कॅल्शिअम' आणि 'व्हिटॅमिन-डी३' च्या चाचण्या करून घ्या.