Mahesh Gaikwad
उष्णतेमुळे त्वचेतील तेलाच्या ग्रंथी जास्त प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे चेहरा तेलकट होतो. परिणामी चेहऱ्यावर लालसर डाग निर्माण होतात आणि पिंपल्सचा प्रादुर्भाव होतो.
उष्णतेमुळे शरीरातील रक्तसंचार वाढतो. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पिंपल्स किंवा लालसर डाग दिसायला लागतात.
उष्णतेमुळे होणाऱ्या पिंपल्सच्या समस्येसाठी काही सोपे आणि घरगुती उपाय करू शकतो. पाहूयात काय आहेत हे उपाय.
काकडी, कलिंगड, नारळ पाणी आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
दिवसभरात कमीत-कमी ८ ते १० ग्लास पाणी आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिल्यामुळे शरीराचे तापमान थंड राहण्यासह त्वचाही हायड्रेट राहते.
जास्त तळलेले, मसालेदार पदार्थ जे शरीराची उष्णता वाढवितात, ते खाण्याचे टाळा.
दिवसभरात दोनवेळा चेहरा थंड पाण्याने फेसवॉशने धुवा. चेहऱ्यावर जास्त घाम साठू देवू नका.
अति तणावामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. ज्यामुळे पिंपल्स आणि मुरूम वाढतात. यासाठी योगा, मेडीटेशन आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.