Mahesh Gaikwad
कंबरदुखीच्या असह्य वेदना कमी करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात हळद घालून प्या. यामुळे सूज आणि दुखणे कमी होते.
कोमट मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेलाने कंबरेची मालिश करा. यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो.
तव्यावर गरम केलेला ओवा एका कपड्यात गुंडाळून कंबरेच्या दुखणाऱ्या भागाला शेक द्या. यामुळे अखडलेले स्नायू मोकळे होतात.
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या. यामुळे पोट साफ होईल व पोटावरील दाब कमी होईल.
दररोज सकाळी नियमित १० मिनिटे भुजंगासन आणि मकरासन करा. यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो व दुखणे कमी होते.
जर तुम्ही खूप वेळ बसून काम करत असाल, तर ३०-४५ मिनिटांनी ब्रेक घेवून पाय मोकळे करा.
अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने घालून अंघोळ करा. या पाण्याने कंबरेच्या भागाला शेक द्या.
झोपण्यासाठी मऊ गादी वापरल्यामुळेही पाठदुखीचा त्रास होवू शकतो. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.