Mahesh Gaikwad
पावसाळा आला की बाजारामध्ये गर्द जांभळ्या रंगाचे जांभूळ ही विक्रीसाठी आलेले दिसते. अनेकजण जांभूळ चवीने खातात.
जांभळात भरपूर प्रमाणात फायबर असतात, जे पचनक्रिया सुधारतात. यामुळे गॅस, अॅसिडिटी व अपचन यापासून आराम मिळतो.
जांभळात जॅम्बोलीन व जॅम्बोसीन हे विशिष्ट घटक ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फळ वरदान आहे.
जांभळामध्ये नैसर्गिक रक्त शुद्धीकरण करणारे घटक आढळतात. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
जांभळात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन-सी मुबलक प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी-खोकला कमी होतो.
जांभळाचे सेवन केल्याने त्वचा उजळते, मुरुमांचे प्रमाण कमी होते. याशिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
जांभळाच्या बियांची पावडर करून त्याने दात घासल्यास दात मजबूत राहतात व हिरड्यांचे दुखणे व संसर्गाची समस्या दूर होते.
जांभळामध्ये कॅलरी कमी असतात, ज्यामुळे पचनासाठी जास्त ऊर्जा लागते. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.