Anuradha Vipat
उत्तम आणि निरोगी आरोग्य राखण्यासाठी महागड्या औषधांपेक्षा आपले रोजचे घरगुती उपाय आणि योग्य जीवनशैली अधिक प्रभावी ठरते.
आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यात रात्री साठवलेले पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते, गॅस-बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या. हळदीमधील 'कर्करोगविरोधी' आणि 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
जर तुम्हाला सतत सर्दी, खोकला किंवा अपचनाचा त्रास होत असेल, तर आल्याचा छोटा तुकडा पाण्यात उकळून त्यात १ चमचा मध घालून प्या.
आहारात बदाम, अक्रोड आणि रात्री भिजवलेले काळे चणे किंवा मूग यांचा समावेश करा. यातून शरीराला आवश्यक प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि फायबर मिळतात.
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर गॅस आणि अपचन टाळण्यासाठी जिरे आणि ओवा पाण्यात उकळून ते पाणी कोमट करून प्या.